E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आमच्या बहिणींचे कुंकू पुसणार्या दहशतवाद्यांचा खात्मा
Samruddhi Dhayagude
08 May 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले पंतप्रधानांचे अभिनंदन
मुंबई, (प्रतिनिधी) : व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्याचे काम आमच्या जवानांनी केले. पहलगाममध्ये ज्या पद्धतीने आमच्या बांधवांना मारण्यात आले, त्याचा संताप भारतीयांच्या मनात होता, आज भारतीयांना समाधान वाटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते अशी घटना सहन करणार नाही, याचे उत्तर दिले जाईल. भारतीय लष्कराने आज ताकदवान उत्तर दिले आहे. सैन्यदलाने अतिशय अचूकपणे हे ऑपरेशन पार पाडले आहे. या ऑपरेशनला नावही समर्पक देण्यात आले आहे. आमच्या ज्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम केले त्या दहशतवाद्यांनी केले, त्यांना पूर्णपणे समाप्त करण्याचे काम भारताने केले. भारतीय लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईवर ज्यांनी हल्ला केला अशा हाफिज सईद आणि डेव्हिड हेडली यांचे जिथे प्रशिक्षण झाले ते तळही नष्ट करण्यात आले. दहशतवादाच्या विरोधात प्रचंड मोठी लढाई भारताने केली आहे. हा नवीन भारत आहे. अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही, हे भारताने दाखवून दिले आहे. सैन्य दल आणि पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. भारताने गेल्या तेरा-चौदा दिवसांमध्ये पहिल्यांदा सर्व देशांशी संपर्क करून जी पहलगामची घटना त्यात पाकिस्तान कसा दोषी याचे पुरावे दिले दहशतवादी पाक प्रशिक्षित होते, याची माहिती दिली. यामुळे जागतिक जनमत आपल्या बाजूने आहे. संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. पाकिस्तानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्व तळ नष्ट करण्याचे काम लष्कराने केले आहे. पाकिस्तानच्या आतल्या भागात जाऊन देखील नष्ट करण्याचे काम केले.
राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही
युद्धापेक्षा ज्या दहशतवादयांनी हल्ला केला त्यांना मारले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत विचारले असता, राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही; संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठिशी उभा आहे. संपूर्ण जग भारताच्या पाठिशी उभे आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आम्ही सावध आहोत, असेही ते म्हणाले. राफेलवर शंका घेणारे लोक मूर्ख आहेत. देशासोबत अशा प्रकारचा विनोद करतात; त्यांना कोणतेही उत्तर देऊ इच्छित नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
Related
Articles
सचिन यादवला रौप्यपदक
01 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा
05 Jun 2025
‘आणीबाणी’ निमित्त सरकार विशेष अधिवेशनाच्या विचारात
30 May 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी